Maharashtra Politics Updates | 'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit-Shah-CM-Devendra-Fadnavis
'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना

'तयार राहा...'; भाजपा हायकमांडच्या सगळ्या आमदारांना सूचना

राज्यात सध्या राजकीय वादळ आलेलं आहे. या वादळाचा मोठा फटका महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला बसलेला आहे, हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं आहे. अशातच आता भाजपाने आपल्या सर्व आमदारांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (BJP High command special orders to BJP MLAs)

हेही वाचा: "पुढच्या दोन महिन्यात फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार" : रवी राणा

एकनाथ शिंदेंच्या (Shivsena leader Eknath Shinde) बंडाची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले होते. तिथे त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Home minister Amit Shah) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता या विशेष सूचना देण्याची माहिती हाती येत आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: दिल्लीत भाजपच्या हालचाली गतिमान; करेक्ट कार्यक्रम होणार?

पुढचे ४८ तास संपर्कात राहा. कोणत्याही दौऱ्यावर किंवा परदेशामध्ये जाऊ नका अशा सक्त सूचना भाजपाने सर्व आमदारांना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईला पोहोचायला लागू शकतं. त्यामुळे सर्वांनी संपर्कात राहावं अशा सूचना भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.

Web Title: Bjp Delhi Devendra Fadnavis Shivsena Eknath Shinde Bjp Mlas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top