Rahul Gandhi: मोदींवर टीका केली तर...; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे इशारावजा दिशानिर्देश?

येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून लगेचच प्रचारालाही सुरुवात होईल.
Rahul Gandhi_ECI
Rahul Gandhi_ECI

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून लगेचच प्रचारालाही सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना इशारावजा दिशानिर्देश जाहीर केले आहेत. (Election Commission of India issues an advisory to Congress MP Rahul Gandhi)

केंद्रीय निवडणूक आयोगानं खास राहुल गांधी यांच्यासाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. यापूर्वी प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टिप्पण्या केल्या होत्या. तसेच दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि त्यावर राहुल गांधींनी दिलेलं उत्तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना शब्द काळजीपूर्वक वापरण्याचे आणि टिका-टिप्पणीबाबत सतर्क राहण्याचा सल्ला या दिशानिर्देशांतून दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

Rahul Gandhi_ECI
आश्चर्य! शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका; भारतात केरळमधील शाळेचा खास उपक्रम

दरम्यान, निवडणूक आयोगानं राहुल गांधींना सल्ला दिलेला असला तरी याचा अर्थ असाही होतो की, जर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या या सल्ल्याचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर आचारसंहिता भंग तसेच वैयक्तिक पातळीवरील तक्रारीनुसार, कारवाई होऊ शकते. (Latest Marathi News)

Rahul Gandhi_ECI
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावर दिसलं हास्य! मविआसोबतच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटला?

त्यामुळं आता राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या या दिशानिर्देशांना काय उत्तर देतात हे पहावं लागेल. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं अशा प्रकारे केवळ एकाच नेत्याला स्वतंत्ररित्या अशा प्रकारचा सल्ला देण्याबाबतही विविध प्रतिक्रिया येऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com