नवाब मलिकांवर आज फुटणार बॉम्ब? हाजी अराफत शेख यांची पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

नवाब मलिकांवर फुटणार बॉम्ब? हाजी अराफत शेख यांची पत्रकार परिषद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी (ncp leader nawab malik) काल पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर (devendra fadnavis) निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे असे अनेक गंभीर आरोप मलिकांनी लावले. त्यावर आता उत्तर म्हणून महाराष्ट्रतील भाजप नेते हाजी अराफत शेख आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या विरोधात खळबळजनक खुलासे करणार आहेत.

मलिकांच्याआरोपांना हाजी अरफात शेखचे उत्तर

खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असं मलिक म्हणाले. मलिकांच्या याच आरोपांना आज हाजी अरफात शेख उत्तर देणार आहे. खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता. मलिक म्हणाले की, खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं. खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असं ते म्हणाले.

हेही वाचा: Facebookवर मिळतात सरासरी 15 धमक्यांच्या, 5 प्रक्षोभक तर 3 द्वेषपूर्ण पोस्ट्स

हेही वाचा: मान मोडून काम केल्याने मानेचे दुखणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

loading image
go to top