"एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण..."; भाजपचा सणसणीत टोला

"एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण..."; भाजपचा सणसणीत टोला "भाजपाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना ही बुद्धी झाली." BJP Keshav Upadhye slams CM Uddhav Thackeray over Mumbai Local Train Issue 2 doses of Covid 19 vjb 91
uddhav-thackeray-sad
uddhav-thackeray-sad

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीला (People Demand) अखेर न्याय मिळाला. मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local Trains) स्वातंत्र्यादिनापासून (Independence Day) सर्वसामान्यांसाठी सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, लोकल सेवा १५ ऑगस्टपासून (15th August) सुरु होतील. मात्र, ही सुविधा (Service) फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी (2 doses) आणि त्याला १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) असे दोन्ही पद्धतीचे पास मिळवून देण्याची सुविधा असणार आहे. या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला.

uddhav-thackeray-sad
मुंबई लोकल होणार सुरू.. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी!

"भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लशीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?", अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

याशिवाय, केशव उपाध्ये यांनी वेगळे ट्वीट करत मुंबईकरांचे अभिनंदन केले. "सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!", असे ट्वीट त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com