esakal | अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदी राहता येणार नाही - किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar kirit somaiya

अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदी राहता येणार नाही - किरीट सोमय्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांवर नुकतीच आयकर विभागाने छापेमारी केली. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. ''जरंडेश्वर साखर कारखान्यात घोटाळे झाले आहेत. यामध्ये मुख्य भागीधारक हे अजित पवारांचे कुटुंबीय आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांवर छापेमारी कऱण्यात आली. त्यांना उपमुख्यमंत्रिपदी राहता येणार नाही. बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती करणे हे दुर्दैवी आहे'', असे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर केले.

हेही वाचा: मावळ गोळीबारावरून पवारांचे फडणवीसांना उत्तर!

हेही वाचा: 'अजूनही यौवनात मी', फडणवीसांवर संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी

''जंरडेश्वर साखर कारखाना घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. अजित पवारांनी स्वतः त्या कारखान्याचा लिलाव केला आणि स्वतःच विकत घेतला. तो देखील बेनामी पद्धतीने घेतला. त्यांनी सर्व नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपदी राहता येणार नाही'', असे किरीट सोमय्या म्हणाले.

''माझ्या बहिणीच्या घरी धाडी असं अजित पवार म्हणाले होते. जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक मुख्य भागधारकामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या पतीचे नाव आहे. तसेच आणखी दुसऱ्या एका बहिणीचे ना आहे. हे सर्व कोण आहेत, असा माझा पवार कुटुंबीयांना प्रश्न आहे. हे अजित पवारांच्या कुटुंबातील आहेत. आता खरं-खोटं काय आहेत हे अजित पवारांनी स्पष्ट करावे. यामध्ये बहिणीचा काही संबंध नाही, तर मग अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती उभारली का?'' असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले.

''घोटाळे हे फक्त जरंडेश्वरपुरते मर्यादीत नाहीत. त्यांची एक बहीण अजित पवारांच्या अनेक नामी-बेनामी कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत, असेही सोमय्या म्हणाले. जरंडेश्वरचे साखर कारखान्यापासून तर मूळ मालकापर्यंत पोहोचताना ९७ नावे येतात. पार्कलिंक सॉईल प्रायव्हेट कंपनीचे मालक हे स्वतः अजित पवार आहेत'', असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

loading image
go to top