'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात'; आशिष शेलारांची टीका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र शिवसेनेवर आदित्य ठाकरेंवर नाईट लाईफच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे. 

मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे, मुंबईतील नाईट लाईफची! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे काही स्तरांतून कौतुक होतेय, तर काही बाजूने टीकाही होत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मात्र शिवसेनेवर आदित्य ठाकरेंवर नाईट लाईफच्या निर्णयावरून जोरदार टीका केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नाईट लाईफचा निर्णय घेत 24 तास हॉटेल सुरू ठेवून शिवसेना मुंबईकरांची शांतता भंग करणार आहे, याला आमचा विरोध आहे. निवासी भागातल्या लोकांना या नाईट लाईफचा फटका बसणार आहे. 'व्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे.. पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार, लेडिजबार, पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण.. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच!' असे ट्विट शेलार यांनी केले आहे. 

'नाईट लाईफ'वरून रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचे केले कौतुक; म्हणाले...

नाईट लाईफबाबतची नियमावली अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, ती प्रसिद्ध झाली की सविस्तर बोलू. सरकारने कायदा सुव्यवस्था, पोलिस व सुरक्षिततेचा विचार करायला हवा. यामुळे नवीन प्रश्न तयार होणार आहेत, असे आशिष शेलारांनी सांगितले. आदित्य ठाकरे हे नाईट लाईफसाठी आग्रही होते. 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफच्या प्रयोगाला सुरवात होईल.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar criticized Shivsena on Mumbai Night Life decision