'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले..? आणि फसले! : शेलार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन!!! जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपमुळेच झाले. काहींचा विरोध होता..

मुंबई : भाजप नेते आशीष शेलार यांनी ट्विट करत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने राज्यसभेत मतदानादरम्यान सभात्याग केल्यानंतर जोरदार टीका केली आहे. जनपथला घाबरून सभागृहातून पळाले? आणि फसले असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळी भूमिका घेत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेतील मतदानावेळी अनुपस्थित राहून बाहेर पडण्याचा मार्ग निवडत एका अर्थाने पुन्हा सरकारला पूरक भूमिका घेतली. शिवसेनेने सभात्याग केल्याने एकप्रकारे भाजपला मदतच झाली. आता याच शिवसेनेच्या भूमिकेवरून आशीष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. 

#CAB : राज्यसभेतही 'नागरिकत्व' उत्तीर्ण!

शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन!!! जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपमुळेच झाले. काहींचा विरोध होता.. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले.. काहीजण "जनपथला" घाबरुन सभागृहातून पळाले..? आणि फसले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar targets shivsena on Citizens Amendement Bill