esakal | शपथविधीची वेळ रामप्रहराची, आमच्यासोबत 170 आमदार : आशीष शेलार
sakal

बोलून बातमी शोधा

शपथविधीची वेळ रामप्रहराची, आमच्यासोबत 170 आमदार : आशीष शेलार

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सकारात्मक सरकार आले आहे. आम्ही जनतेमध्ये फिरणारे कार्यकर्ते आहोत. जमेल भाषेत बोलायला मी संजय राऊत नाही.

शपथविधीची वेळ रामप्रहराची, आमच्यासोबत 170 आमदार : आशीष शेलार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यपालांनी आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आम्ही 170 आमदारांच्या जिवावर बहुमत सिद्ध करू. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो येईल तो येईल. आम्ही सकाळी सहा वाजता संघाच्या शाखेत जाणारे स्वयंसेवक आहेत. सकाळी सहाची राम प्रहराची वेळ असते, ती त्यांना काळोख वाटत आहे. राम प्रहरी आम्ही केलेले सत्कर्म आहे. त्यामुळे आम्हाला संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये, असा आमचा त्यांना सल्ला आहे, अशी जोरदार टीका भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांनी आज (रविवार) सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने अजित पवारांना साथीला घेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शेलार यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांनी 30 नोव्हेंबरला आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू असा दावाही केला आहे.

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

शेलार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सकारात्मक सरकार आले आहे. आम्ही जनतेमध्ये फिरणारे कार्यकर्ते आहोत. जमेल भाषेत बोलायला मी संजय राऊत नाही. संजय राऊत सत्तेसाठी हापापलेले आहेत. राऊतांसारख्या भाषेला भाजपला स्थान नाही. दिल्लीत सोनिया गांधींशी केलेली सलगी हा गोराबाजार आणि आम्ही अजित पवारांसोबत गेलो तो काळाबाजार का? आणीबाणीबाबत शिवसेनेने आपली भूमिका बदलल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. 

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?