esakal | ...तर पवार साहेब प्रॅक्टिकल निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस 
sakal

बोलून बातमी शोधा

fadnavis_20press_20conference_20reaction_20on_20sharad_20pawar_20pakistan_20statement.jpg

आरेतल्या कारशेडवर 100 कोटी पेक्षा जास्त खर्च झालेत. केंद्र सरकारने सुद्धा निधी दिला. आरेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. बिकेसीचा पर्याय पूर्ण अयोग्य असून आरेमध्ये बांधकाम केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही,असेही फडणवीस यावेळी म्हणाले.  

...तर पवार साहेब प्रॅक्टिकल निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे : मेट्रो प्रकल्प होऊ नये असे कोणालाच वाटत नाही. त्याचे श्रेय कोणालाही मिळो, पण प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, असे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मेट्रोसोबत आम्ही इमोशनली जोडलो गेलो आहोत. या प्रकल्पासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या आहेत. पण मेट्रो प्रकल्पाबाबत सध्याच्या सरकारमध्ये सकारात्मकता दिसत नाही याचे दु:ख वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.

2021 मध्ये येणाऱ्या मेट्रोसाठी 2024 पर्यंत वाट का पाहायची? असा प्रश्न त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांना मेट्रोसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या सरकारने (महाआघाडी सरकार) हाय पॉवर कमिटी तयार केली. या कमिटीने दिलेला अहवाल  हे सरकार का वाचत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.

भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा

आरेतल्या कारशेडवर 100 कोटी पेक्षा जास्त खर्च झालेत. केंद्र सरकारने सुद्धा निधी दिला. आरेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. बिकेसीचा पर्याय पूर्ण अयोग्य असून आरेमध्ये बांधकाम केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही,असेही फडणवीस यावेळी म्हणाले.  

हा प्रकल्प केवळ राज्य सरकारचा नाही. त्यामुळे सर्वांशी मिळून ठराव करावा. या प्रकल्पाच सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांनी घेतलं तरी हरकत नाही. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवारांचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री आणि पवार साहेबांनी पंतप्रधानांशी बोलावे. पवार साहेबांसोबत कितीही राजकीय मतभेद असले तरी अहवाल वाचल्यानंतर ते प्रकल्पाला विरोध करणार नाहीत. ते प्रॅक्टिकल निर्णय घेतील असा विश्वासही  देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

loading image