पक्षांतर्गत कुरघोड्यांचे माझ्याकडे पुरावे, देऊ का? : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीला उपस्थिती राहिल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.

जळगाव : मी पक्षावर नाराज नाही. मात्र, पक्षांतर्गत कुरघोड्यांबाबत माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. पक्षाने मला परवानगी दिली तर पत्रकार परिषद घेऊन मी ते पुरावे सर्वांसमक्ष जाहीर करेल, असा धक्कादायक गौप्यस्फोट आज (शनिवार) भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीला उपस्थिती राहिल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते.

बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’

खडसेंचे बैठकीस्थानी आगमन झाल्यानंतर पत्रकारांनी आपण उशिरा का आलात? याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, मला बैठकीचा साडेतीन वाजताचा निरोप होता. त्यानुसार मी वेळेवर हजर झालो आहे. राहिला विषय नाराजीचा तर मी पक्षावर नाराज नाही. मात्र, गिरीश महाजन यांनी मला जर काही पुरावे असतील तर ते जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. माझ्याकडे पुरावे असून मी ते आधीच पक्षश्रेष्ठींकडे दिले आहेत. आज बैठकीत मला प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ते सर्वांसमक्ष जाहीर करेल, असेही खडसे म्हणाले.

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान; 20 जागांवर लढा

पक्षाच्या निर्णयाविरोधात मी जाणार नाही, असेही खडसे शेवटी म्हणाले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी केलेल्या आव्हानासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रतिक्रियांचे प्रिंट आऊट काढून त्यांचे एक पुस्तक खडसेंनी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. या प्रकाराची जोरदार चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Eknath Khadse challenge to Girish Mahajan for internal dispute