पक्ष नक्की निर्णय घेईल, माझा पक्षावर विश्वास : खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पक्ष नक्कीच चांगला निर्णय घेईल. पक्ष बदनाम होईल, असे कोणतेही काम करून नका. मी पक्षाच्या आदेशाचे नेहमी पालन केले आहे. जिथं भाजप नव्हती तिथं भाजप रुजवली. आपण आरएसएसचे स्वयंसेवक आहोत, चुकीचे काम करू नका.

जळगाव : मी पक्षाच्या आदेशाचे नेहमी पालन केले आहे. जिथं भाजप नव्हती तिथं भाजप रुजवली. पक्ष माझ्यासोबत चांगला निर्णय घेईल, माझा पक्षावर विश्वास आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांचे दर्शन घेऊन आदित्यने टाकले मातोश्रीबाहेर पाऊल

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या दोन्ही उमेदवारांच्या याद्यांमध्ये खडसे यांना डावलण्यात आले आहे. खडसे यांना अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे खडसेंनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा बोलाविला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. या मेळाव्यात खडसे एका कार्यकर्त्याशी थेट फोनवरून बोलत असल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपर्कात असल्याची चर्चा खडसेंबाबत सुरु आहे. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; ही आहेत नावे

खडसे म्हणाले, की पक्ष नक्कीच चांगला निर्णय घेईल. पक्ष बदनाम होईल, असे कोणतेही काम करून नका. मी पक्षाच्या आदेशाचे नेहमी पालन केले आहे. जिथं भाजप नव्हती तिथं भाजप रुजवली. आपण आरएसएसचे स्वयंसेवक आहोत, चुकीचे काम करू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Eknath Khadse disappointed after not given candidateship