मलिकांवर भाजप नेत्याचा पुन्हा निशाणा, "फिर लेनी पड़ेगी मियाँको..!" | mohit kamboj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

मलिकांवर भाजप नेत्याचा पुन्हा निशाणा, 'फिर लेनी पड़ेगी मियाँको..!'

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (ncp nawab malik) यांनी एनसीबी (NCB) आणि भाजपावर (bjp) अनेक आरोप केले आहेत. कॉर्डिलिया क्रूझ पार्टी (drugs party) प्रकरणापासून या संबंधात अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. आता नव्या वर्षातही आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी (NCB), समीर वानखेडे (sameer wankhede) आणि भाजपावर (bjp) गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज (mohit kambhoj) यांनी ट्विट करत प्रत्यारोप केले आहेत.

दरम्यान मोहित कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात अखेर मलिक यांना यापूर्वी दिलासा मिळाला असून, यावर कंबोज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.तसेच "आज फिर लेनी पड़ेगी मियाँ को बेल !" अशा मथळ्याखाली ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे, क्रूझवरील पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला सोडून देण्यात आले, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला

मोहित कंबोज हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल झाला आहे. मलिक यांनी कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केल्याप्रकरणी त्यांनी हा खटला दाखल केला आहे. या खटल्यात अखेर माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना काही जामीन मंजूर केला आहे. त्यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. याचबरोबर त्यांना 5 हजार रुपयांची हमीही भरण्यास सांगण्यात आले आहे. यावर कंबोज यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधताने म्हटले आहे की,"आज फिर लेनी पड़ेगी मियाँ को बेल !"

हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा

हेही वाचा: शरद पवार उंचीने नव्हे तर कर्तृत्वाने ओळखले जातात - जितेंद्र आव्हाड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top