लग्न समारंभासाठी 'या' आहेत अडचणी, सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लग्न समारंभासाठी 'या' आहेत अडचणी, सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : घरच्याघरी लग्न समारंभ उरकण्यास अटी-शर्थीसह राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र घरच्याघरी लग्न करण्यास काही अडचणी असल्याने लॉकडाऊन दरम्यान लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्ये‍ लग्न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे. 

राज्याभरातील अनेक कुटुंबाकडून लग्न समारंभांबाबत आपल्या अडचणी सांगितल्या जातात आहेत. या अडचणी लक्षात घेऊन या संदर्भात मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांना ई-मेल द्वारे पत्रे पाठविली आहेत. मुनगंटीवार यांनी स्वता याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा सुध्दा  केली आहे.

कोरोना विषाणुचा संसंर्ग बघता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याठी केवळ 50 लोकांना लग्न समारंभ साजरा करण्यााची परवानगी देण्यात आली आहे. हे समारंभ घराच्या परिसरात करावे असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र  अनेकांची घरे लहान असतात, त्यामुळे 50 लोकांच्या उपस्थितीत घराच्या परिसरात लग्न  समारंभ साजरे करणे अधिक अडचणीचे ठरत आहे.  त्यामुळे नॉन एसी सभागृह किंवा लॉनमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी दिल्यास  ते अधिक सोईचे ठरेल. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन सुध्दा निट करता येईल असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

हॉल, कॅटरर्स व्यवसायाला फटका

मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात सर्वात जास्त लग्न लागतात. मात्र एप्रिल, मे महिन्यातील लॉकडाऊनमुळे अनेक लग्न रद्द करावी लागली. किंवा यातील अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका हॉल, कॅटरर्स व्यवसायिकांना बसला आहे. राज्य सरकारने या महिन्यापासून लॉकडाऊन ओपनींगच्या दिशेने सुरुवात केली आहे. त्यामुळे लॉन, नॉन एसी ह़ॉलमध्ये लग्न करण्याची परवानगी दिल्यास सभागृह व्यावसायिकांना थोडा आर्थिक दिलासाही मिळेल.

bjp leader sudhir mungantiwar writes a letter to cm regarding wedding ceremonies

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com