मविआविरोधात आक्रमक भूमिका घ्या: भाजप नेत्यांच्या सूचना; सूत्रांची माहिती

राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या हायकमांड नेत्यांची दूरध्वनीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
BJP
BJP sakal
Updated on

मुंबई : राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या हायकमांड नेत्यांची दूरध्वनीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील तीन चार दिवसांत महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडत आहेत त्यामुळे भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.

मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असून भोंग्याच्या प्रकरणावरुन हा वाद पेटला आहे. दोन दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काल न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्याअगोदर मोहित कंबोज यांच्याही गाडीवर हल्ला झाला होता. या प्रकरणाची दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

BJP
मॅक्रॉन बनणार फ्रान्सचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष; ले पेनचा पराभव

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ही चर्चा झाली असून महाराष्ट्रातील हायकमांड नेत्यांसोबत ते बोलले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Hard Work Pays Off: NDA Medalists Reflect on Their Remarkable Training Experience
Lives at Risk in Ambenali Ghat; Slow Infrastructure Work Under Scrutiny
Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs
Marathi News Esakal
www.esakal.com