esakal | भाजपकडून राज्यसभेसाठी दोन नावे निश्चित; उदयनराजेंना संधी मिळणार?
sakal

बोलून बातमी शोधा

bjp may give chance rajay sabha ramdas athawale udayanraje bhosale

राज्यसभेसाठी 37 मतांचा कोटा आहे. पहिल्या पसंतीची कमीत कमी 37 मते घेणारा उमेदवार जर निवडणूक झाली तर निवडून येणार आहे.

भाजपकडून राज्यसभेसाठी दोन नावे निश्चित; उदयनराजेंना संधी मिळणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यसभेवर राज्यातून निवडून दिल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला पसंती असून, तिसरी जागा लढवायची की नाही याबाबत पक्षात सुरू चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

37 मतांचा कोटा 
भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे संभाव्य उमेदवार असतील. राज्यसभेसाठी 37 मतांचा कोटा आहे. पहिल्या पसंतीची कमीत कमी 37 मते घेणारा उमेदवार जर निवडणूक झाली तर निवडून येणार आहे. सध्या भाजपकडे 105 इतके संख्या बळ आहे. त्यामुळे तिसऱ्या उमेदवारासाठी सहा मते कमी पडतात. ही कमी पडणारी मते कशी मिळवायची याबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपचे खासदार संजय काकडे यांची कारकीर्द संपत आहे. मागील खेपेस ते अपक्ष म्हणून उभे राहून निवडून आले होते. त्यांनी देखील उमेदवारीसाठी आपले नाव पुढे केले आहे. त्यामुळे तिसऱ्या जागेसाठी नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा - पुण्याचा तरुण ठरला जगातील सर्वोत्तम आई!

आणखी वाचा - मराठा आरक्षणाबाबत झाली सकारात्मक चर्चा 

पावसातल्या सभेनं निवडणूक फिरली
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले उदयराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात सभा झाली. त्या सभेत अचानक पाऊस आला आणि संपूर्ण निवडणुकीचं चित्र फिरलं, साताऱ्याचा गड तर, उदयनराजे यांनी गमावला. त्यामुळं आता उदयराजे भोसले यांनी राज्यसभेवर संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

loading image