
आमदाराने मुलाच्या लग्नातला खर्च वाचवला; राबवली लसीकरण मोहीम
अंध, दिव्यांग, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक यांना दिलं प्राधान्य
कल्याण: कल्याण डोंबिवलीत एककीकडे लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे, तर दुसरीकडे खासगी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. समाजातील निम्न वर्गातील नागरिकांना मात्र ही महागडी लस खरेदी करणे शक्य नाही. या नागरिकांची ही गरज ओळखत कल्याण पूर्वेतील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी तीन दिवसीय लसीकरण मोहीम रावबिली आहे. मुलाच्या लग्नातील खर्च कमी करून त्यांनी गरिबांसाठी हे शिबीर भरविले. नागरिकांनीही पहिल्या दिवशी लस खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
कल्याण पूर्वेतील तिसगाव रोड येथील तिसाई कार्यालयात तीन दिवसीय लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने एम्स रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात येत आहे. अंध ,दिव्याग, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

आमदार गणपत गायकवाड
नागरिकांना मी आश्वासन दिले होते की, मुलाच्या लग्नाचा खर्च कमी करून त्या निधीतून लसीकरण शिबिर भरविणार. त्यानुसार हे शिबीर भरविले. लसींचा तुटवडा भासत आहे कारण राज्य सरकार काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी जास्त लस पूरवठा करीत आहे. मागणीनुसार सर्वांना योग्य लस पुरवठा केल्यास ही टंचाई जाणवणार नाही.
- आमदार गणपत गायकवाड