Gopichand Padalkar | "जितेंद्र आव्हाड हे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand Padalkar
"जितेंद्र आव्हाड हे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार"

"जितेंद्र आव्हाड हे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार"

भाजपनेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे नेहमी आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. विरोधकांच्या टीकांचा आणि वेगवेगळ्या वक्तव्यांचा पडळकर चांगलाच समाचार घेत असतात. त्यातच आता पुन्हा एकदा पडळकर ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचं सरकार आता मात्र ओबीसींविषयी जी काही प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व फसवं आहे अशी टीका पडळकरांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायलयानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत यांनी दिड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमिन सरकलेली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. पुढे बोलताना त्यांनी राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त असल्याचा आरोप केला.

हेही वाचा: मी कालच राजीनामा दिलाय; अपात्रतेच्या कारवाईवर दरेकरांचे प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात माझा ओबीसींवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खुष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत असंही पडळकर म्हणाले.

हेही वाचा: Lockdown in Mumbai| मुंबईत लवकरच लॉकडाऊन? पालिका आयुक्तांची माहिती

पडळकर यांनी यावेळी अजित पवारांवरही टीका केली. ते म्हणाले की, अजित पवार म्हणतात, इंपेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणूका आम्ही घेणार नाहीत, वेळ पडली तर प्रशासक नेमू. म्हणजेच आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच हेतू दिसतोय. ओबीसींवर तुम्हाला एवढंच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यांना आपण निवडूण द्यावं. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top