esakal | भाजप नेते संजय काकडे शरद पवारांच्या निवासस्थानी; निरोप काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Kakade

अजित पवार अद्यापही भाजपसोबत जाण्याच्या आपल्या मतावर ठाम आहेत. अजित पवारांनी आपला निरोप घेऊन काकडेंना शरद पवारांकडे पाठविले तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता आज काय सत्तानाट्य पाहायला मिळतेय, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.

भाजप नेते संजय काकडे शरद पवारांच्या निवासस्थानी; निरोप काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात.

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत.

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार अद्यापही भाजपसोबत जाण्याच्या आपल्या मतावर ठाम आहेत. अजित पवारांनी आपला निरोप घेऊन काकडेंना शरद पवारांकडे पाठविले तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता आज काय सत्तानाट्य पाहायला मिळतेय, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

loading image