मागच्या वेळी प्रसाद लाड यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे 9 आमदार फोडले होते...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले
Vidhan Parishad 2022 Political News
Vidhan Parishad 2022 Political News
Summary

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले.

सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपने केलेली जोरदार मोर्चेबांधणी दिसून आली. राज्यसभेनंतर आज विधान परिषेदची निवडणूक पार पडत असून अवघ्या काही वेळात हा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीतही भाजपने राज्यसभेप्रमाणे एक उमेदवार जास्त दिला आहे. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (Vidhan Parishad 2022 Political News)

या दिग्गजांपैकी भाजपाचे तगडे नेते म्हणून प्रसाद लाड यांच्याकडे पाहिले जाते. प्रसाद लाड हे मूळचे उद्योगपती आहेत. ते मुंबईत क्रिस्टल सुरक्षा एजन्सी चालवतात. मुंबई बँकेचे ते संचालक आहेत. सध्या भाजपात असलेले प्रसाद लाड याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी लाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र एकेकाळी लाड यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तब्बल ९ आमदार फोडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतरच्या एका निवडणुकीत लाड यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलीप माने यांना मैदानात उतरवले होते आणि मत फुटल्याने प्रसाद लाड विजयी झाले होते.

Vidhan Parishad 2022 Political News
हॉटेलात राहिलो, गादीवर झोपलो, नायतर कोण विचारत होतं; आमदाराची खंत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले आणि राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झाला होता. राणे यांना अटक झाल्यानंतर राज्यातील भाजपचे अनेक बडे नेते आक्रमक झाले होते. यात सर्वाधिक आक्रमक झाले होते ते म्हणजे भाजपा नेते प्रसाद लाड.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नारायण राणे यांचे राजकीय पुनर्वसन करताना त्यांना विधानपरिषद देण्यात आली होती. पण २०१७ साली कॉंग्रेसवर नाराज होवून राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षातील एकनिष्ठ नेत्यांना डावलून प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती.

Vidhan Parishad 2022 Political News
हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र, मतदानासाठी पोहोचताच दिलीप मोहितेंची नाराजी

राणेंना अटक झाली आणि त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले होते. राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला होता. शिवाय त्यावेळी शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. राणे यांना अटक होताच लाड यांनी थेट पोलिस चौकीत ठिय्या मांडला होता. कोणतीही कलमं नसताना राणेंना अटक कशी काय केली असा सवालही त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती.

प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याची चर्चाही रंगली होती. लाड यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलीप माने यांना मैदानात उतरवले होते आणि मत फुटल्याने प्रसाद लाड विजयी झाले होते. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतही लाड यांचा शिवसेनेमुळेच निसटता पराभव झाला होता. म्हणून त्यांनी सर्वात आधी मातोश्रीचा पाठिंबा मिळवला मगच निवडणुकीत उडी घेतली होती.

Vidhan Parishad 2022 Political News
मुझे यक़ीं है, कि ये आसमान..., नाना पटोलेंचा नेमका रोख कुणावर?

भाजपनेही राणेंचा पत्ता कट करून लाड यांना उमेदवारी दिली होती. आघाडीच्या काळात त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपदही सांभाळलं होतं. आम्ही भाजपच्या कार्यक्रमला आलो आहोत. तुम्हाला काय वाटलं की शिवसेना भवन तोडायला आलो की काय? जर अंगावर आलात तर शिवसेना भवनही तोडू असा थेट इशारा लाड यांनी एकदा शिवसेनेला दिला होता. या विधानामुळे वादही निर्माण झाला होता. आता हा वाद पेटू शकतो हे लक्षात आल्यानंतर लाड यांनी तात्काळ यू टर्न घेतला होता. प्रसाद लाड यांनी ट्वीट करून आपल्या विधानाबद्दल सारवासारव केली होती.

दरम्याान, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आली होती. नारायण राणे यांच्या अटकेनंतर प्रसाद लाड सर्वाधिक आक्रमक झालेले दिसले होते. पण काही वर्षांपूर्वी राणे यांच्या राजीनाम्यामुळे लाड यांना आमदारकीची संधी मिळाली होती. त्याचा असाही एक किस्सा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगला होता.

Vidhan Parishad 2022 Political News
'आज कुणी पावसात भिजलं तरी कोणताही परिणाम होणार नाही'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com