मुझे यक़ीं है, कि ये आसमान..., नाना पटोलेंचा नेमका रोख कुणावर?

मते देणार नसाल तर सरकार धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने पहाटे दिला आहे.
Nana Patole News | MLC Election Updates
Nana Patole News | MLC Election UpdatesSakal
Summary

मते देणार नसाल तर सरकार धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने पहाटे दिला आहे.

राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मागील अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु होती. दरम्यान, अनेक दावे-प्रतिदाव्यानंतर आज या निवडणुका पार पडत आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 203 आमदारांनी विधान परिषदेसाठी मतदान केले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचं एक ट्विट चर्तेत आलं आहे. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)

ट्विटमध्ये पटोले म्हणतात, विरोधकांना आमची झेप कमी असल्याचं वाटत असलं तरी आम्हाला विजयाचा विश्वास असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या विधान परिषदेचं वातावरण तापलं असताना नाना पटोले यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Vidhan Parishad election 2022 News updates)

Nana Patole News | MLC Election Updates
हॉटेलात राहिलो, गादीवर झोपलो, नायतर कोण विचारत होतं; आमदाराची खंत

मते देणार नसाल तर सरकार धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने पहाटे दिला आहे. शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरित करण्याचा विचार नसेल तर आमचा उमेदवार पडू शकेल अन् महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा कॉंग्रेसने रात्रभर चाललेल्या चर्चांनंतर दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष कमळबळ मिळावे यासाठी बाण जरा बोथट होता आहेत काय असा थेट प्रश्नही कॉंग्रेसने केला आहे. (Vidhan parishad election maharashtra 2022 result)

विधानसभेच्या अध्यक्षाची निवड सतत पुढे ढकलली जाते आहे. शक्य असूनही मते दिली जात नाहीत हा प्रकार आहे तरी काय अशी संतप्त विचारणा पहाटे पहाटे केली गेली. दरम्यान, राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे. (Maharashtra vidhan parishad election 2022 news)

Nana Patole News | MLC Election Updates
हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र, मतदानासाठी पोहोचताच दिलीप मोहितेंची नाराजी

दरम्यान, काँग्रेसला ८ मतं हवी आहेत ती मिळाली तरच त्यांचा दुसरा उमेदवार जिंकू शकतो. सध्या भाजप आणि काँग्रेसने उभा केलेल्या अतिरिक्त उमेदवारांची मदार ही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांवरच आहे. त्यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com