Vidhan Sabha 2019 : युतीचे घोडे अडले आता 'या' दोन जागांवर

BJP shivsena Alliance are now stuck for two seats
BJP shivsena Alliance are now stuck for two seats

मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेना-भाजप युतीचे घोडे मात्र दोन जागांवर अडले आहे, अर्ध्याहून ही कमी जागा जिंकलेल्या मित्राला 126 जागांचे आश्वासन दिल्यानंतरही मंदा म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघातून तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना माण मतदारसंघात संधी न देता त्या जागा आम्हाला हव्यात असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. या दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव शिवसेनेने अद्याप स्वीकारला नसल्याने युतीचा सस्पेन्स वाढला आहे.

रत्नागिरीत पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार

शिवसेनेतील बहुतांश मंत्र्यांनी युतीबाबत जमवून घेवू असा सूर लावल्याने शिवसेनेची संघटनात्मक आघाडी कमालीची संतापली असल्याचेही समजते. जास्तीतजास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेने अवलंबिलेला दबावतंत्राचा मार्ग न सोडल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे भाजपने नमूद केले आहे.

कोल्हापूरात भाजपला दोनच जागा?

शिवसेनेला योग्य ते महत्व दिले तरीही ते सामोपचाराने घेत नसल्याने नारायण राणे यांच्याप्रवेशासह सर्व बाबींचा भाजपकडून विचार केला जाऊ शकतो. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गणेश नाईक यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ऐरोली या नवी मुंबईतील मतदारसंघातून उमेदवारी देण्यास प्रारंभी शिवसेनेने विरोध केला होता. भाजपने त्याबाबत नकार दिल्यानंतर शिवसेनेने बेलापूरकडे मोर्चा वळवला आहे. मंदा म्हात्रे यांनी या घडामोडींनंतर शिवसेना नाईक कुटुंबाला माफ करू शकते पण माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या महिला कार्यकर्तीला विरोध कसा काय करते असा प्रश्ना केला आहे

भाजपमध्ये अस्वस्थता
म्हात्रे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्या होत्या. त्यांनी स्वगृही परत यावे म्हणून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र म्हात्रे यांनी भाजपतर्फेच आपण निवडणूक लढवू असे स्पष्ट केले आहे. शिवसेनाही मला मदत करेल असा विश्वावस त्या व्यक्त  करीत आहेत. माण येथून जयकुमार गोरे यांनी भाजपत प्रवेश केल्याने ती जागाही भाजपची हक्का ची आहे. या दोन्ही जागांवर शिवसेनेने हक्क् सांगितल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर; 51 उमेदवारांचा समावेश

शिवसेनेने या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी रिंगणात उतरावे अशी इच्छा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्तन केली आहे. चंद्रकांतदादा उत्तर कोल्हापूरमधून रिंगणात उतरतील ,त्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी त्यांना संधी द्यावी असेही सूचविण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत भाजपकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com