Vidhan Sabha 2019 : आरपीआयला 6 जागा निश्चित : आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भाजप-शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 6 जागा सोडण्यात आल्या आहेत.

- रामदास आठवले, अध्यक्ष, आरपीआय.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी गेल्या 3 दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर आज अंतिम निर्णय होऊन भाजप-शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 6 जागा सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज (बुधवार) दिली.

वांद्रे येथील 'संविधान' निवासस्थानी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयला सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, विदर्भातील भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या 6 जागा सोडण्यात आल्या आहेत.

Vidhan Sabha 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु : चव्हाण

माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते-पाटील घेणार आहेत. मात्र, त्यांनी माळशिरसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी, अशी सूचना आज रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. 

उमेदवारी जाहीर झालेल्यांची नावे :

- मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगरमधून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे.

- फलटणमधून दिपकभाऊ निकाळजे पाथरीमधून मोहन फड (आमदार) 

Vidhan Sabha 2019 : निवडणूकीबाबत डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या....

- नायगावमधून राजेश पवार ही नावे निश्चित झाली.

- माळशिरस, भंडारा या दोन जागांची नावे लवकरच जाहीर करू असे आठवले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Shivsena Alliance will give 6 Seats to RPI says Ramdas Athawale