
सरकारचं खोटं बोलणारं आहे, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करायची?
'सोनिया-राहुल गांधींना कोणता आक्षेप असेल, तर त्यांनी न्यायालयात जावं'
सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगताना दिसत आहे. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधलाय. राज्य सरकारचं खोटं बोलणं अजूनही सुरूच आहे. राज्यात काही कामच नाही आणि नुसतं खोट बोलण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केलीय.
माध्यमांशी बोलताना उपाध्ये पुढं म्हणाले, 'जीएसटीबाबत देखील हेच सुरूय. जीएसटीची (GST) देय ऑगस्टमध्ये देतात, असा नियम केलाय. पण, केंद्र सरकारनं (Central Government) काल जीएसटीचं वाटप केलंय. केंद्राकडं आता राज्याचा एकही जीएसटीचा पैसा नाही, तरी देखील यांची रडारड सुरूय.'
हेही वाचा: माजी पंतप्रधानांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींकडं मागितला पाठिंबा
जीएसटी केंद्रानं दिला, त्यामुळं आता तरी पेट्रोल-डिझेलवरील 50 टक्के वॅट सरकारनं कमी करावं. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, ज्याचा पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रापेक्षा जास्त आहे. 25 हजार कोटी जीएसटी निधी गोळा होतो. पण, कधी केंद्र रडत बसत नाही. या सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांचा देखील प्रश्न सोडवला नाही, हे सरकारचं खोटं बोलणारं आहे, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करायची? राहुल गांधी, सोनिया गांधींना कोणता आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात जावं. केंद्रीय संस्था त्यांचं काम चोख करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Web Title: Bjp Spokesperson Keshav Upadhye Criticizes Maha Vikas Aghadi Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..