बंटी-बबलीकडून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं कारस्थान : संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Rautesakal
Summary

काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरुय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बंटी-बबलीकडून (रवी राणा-नवनीत राणा) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) बदनाम करण्याचं कारस्थान सुरुय. मात्र, याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. देशानं आयुक्त संजय पांडेचं (Commissioner Sanjay Pandey) आभार मानले पाहिजेत. कारण, त्यांनी राणा दाम्पत्यांची (Navneet Rana and Ravi Rana) एका व्हिडिओव्दारे पोलखोल केलीय. त्यामुळं आता राणांची जात कोणती याचा तपास व्हायला हवा, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

राऊत पुढं म्हणाले, राणा दाम्पत्यानं केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना पुराव्यासकट आयुक्त संजय पांडेंनी उत्तर दिलंय. पोलिसांनी राणा दाम्पत्याला सौजन्यानं वागवलं. मात्र, या दाम्पत्यानं पोलिसांवर खोटा आरोप केला. जो आता चुकीचा ठरला आहे. त्यामुळं राणांची कोणती जात हे आता तपासायला हवं. तसेच मी कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिली नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

Sanjay Raut
धर्म संसदेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तराखंड सरकारला फटकारलं; म्हणाले..

आपण अनुसूचित जातीचे असल्याने मुंबई पोलिसांकडून आपल्याला भेदभावाची वागणूक दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे केली होती. या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढले आहेत. संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी एक व्हिडिओच ट्विट करत या राणा यांच्या आरोपांचा प्रतिवाद केलाय. या व्हिडिओत राणा पती पत्नी दोघंही आरामात चहा घेत पोलिसांशी बोलताना आणि अत्यंत सामान्य वर्तन करताना दिसत आहेत. त्यामुळं नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आरोपात किती तथ्य आहे, याच्या सत्यतेवरच टीका होऊ लागलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com