

Municipality Election Result Exit poll
ESakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आज, २० डिसेंबर रोजी राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासह सदस्य पदांसाठी तसेच १४३ रिक्त सदस्य जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शांततेत मतदान पार पडले आहे. उद्या म्हणजेच २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याआधीच साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यामध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडवणारे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.