Maharashtra Politics: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा? बाईक रॅली, मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन

शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने वर्चस्व निर्माण करण्याची तयारी सुरू केल्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleEsakal

राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा आता ठाणे जिल्ह्यावर वळवला आहे. ठाण्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी आज भाजपकडून ठाण्यात बाईक रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी हजर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने वर्चस्व निर्माण करण्याची तयारी सुरू केल्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून आज शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाण्यात विविध बैठका घेत आहेत. त्याचबरोबर पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. भाजपने बाईक रॅली झाल्यानंतर संध्याकाळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार असून ते कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याच्या सल्ले देणार आहेत.


Chandrashekhar Bawankule
Jayant patil : सत्ता जाण्याच्या भीतीने राष्ट्रवादी लक्ष्य

दरम्यान बाईक रॅलीनंतर बावनकुळे आज दिवसभर ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. राज्यभरात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाणे शहर जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. याच दृष्टीने बावनकुळे यांच्या हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.


Chandrashekhar Bawankule
Chandrakant Patil : दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक लवकरच ; चंद्रकांत पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com