Bombay High Court : दत्तक मुलाला पालकाची जात लावण्याचा अधिकार, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Adopted Child Caste Right : बाल न्याय कायद्यानुसार दत्तक घेतलेले मूल हे दत्तक पालकांचे पूर्ण कायदेशीर अपत्य ठरते, असे निरीक्षण नोंदवले. एससी-एसटी कायद्यात स्पष्ट तरतूद नसली तरी दत्तक आदेश व जन्मनोंद पुरेसा पुरावा मानता येतो, असे न्यायालयाने सांगितले.
Bombay High Court : दत्तक मुलाला पालकाची जात लावण्याचा अधिकार, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Updated on

'एखाद्या मुलाला त्याच्या जैविक पालकांची जात माहीत नसल्यास त्याला जातीच्या प्रश्नावर कायदेशीर अनिश्चितेत न ठेवता दत्तक पालकांच्या जातीचा दर्जा मिळण्याचा अधिकार आहे,' असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच उच्च न्यायालयाने दिला आणि परित्यक्ता मुलाला दिलेले विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेशही रद्दबातल केले. तसेच पडताळणी समितीने दत्तकविधानाचा कायदेशीर परिणाम विचारात घेण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करून न्यायालयाने याचिका मंजूर केली आणि मुलाला चार आठवड्यांत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com