Rahul Shevale : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाला दिलं लेखी उत्तर; राहुल शेवाळेंनी केला 'हा' दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Shevale

Rahul Shevale: शिवसेनेच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाला दिलं लेखी उत्तर; राहुल शेवाळेंनी केला 'हा' दावा

नवी दिल्ली : शिवसेना नक्की कोणाची यावर आज नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी लेखी उत्तर सादर केलं. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी या सुनावणी दरम्यान काय घडलं याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. (Both factions of Shiv Sena gave written reply to Election Commission of India Rahul Shewale made claim)

शेवाळे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगानं लेखी उत्तरासाठी ३० जानेवारी मुदत दिली होती, त्यानुसार आज दोन्ही गटांकडून लेखी उत्तर सादर करण्यात आलं. कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, त्याला लेखी उत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये आम्ही दोन गोष्टींवर भर दिला आहे की, शिवसेनेची घटना आणि पक्षाची मान्यता ही मतदानावर अवलंबून असते. त्यामुळं आमदार आणि खासदार किती आहेत यावर पक्ष अवलंबून असतो. हे मुद्दे आम्ही मांडले आहेत.

मुख्य नेता हे घटनात्मक पद - शेवाळे

मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे, हे आम्ही आयोगापुढं माडलं आहे. त्यानुसार आम्ही घटनात्मक पद निर्माण केलेलं आहे, असंही आम्ही सांगितलं. बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली त्यावेळीची घटना वेगळी होती, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना हाती घेतली त्यावेळी ती बदलण्यात आली. त्यामुळं बाळासाहेबांच्या मुळ घटनेप्रमाणं आम्ही आमचं सबमिशन केलं आहे. स्वेच्छेन पक्ष सोडल्याचा मुद्दाच नाहीए, त्यामुळं आम्ही शिवसेनेचं पक्षचिन्ह सोडण्याचा प्रश्न येत नाही, असंही यावेळी शेवाळे यांनी म्हटलं आहे.

अंतिम निकाल यायला वेळ लागणार

लेखी युक्तीवाद सादर झाल्यानंतर अंतिम निकाल येण्यास काही दिवस लागणार आहेत. यामध्ये ठाकरे गटानं संध्याकाळी ४ वाजता आपलं ११२ पानांचं लेखी उत्तर निवडणूक आयोगाकडं सादर केला. तर शेवटच्या क्षणी युक्तीवाद करण्यात आला. त्यांनी ११४ पानांचं उत्तर आयोगाकडं सादर केलं आहे.

टॅग्स :Maharashtra NewsDesh news