लाडक्या बहिणींच्या पतसंस्था स्थापनेस ब्रेक! शहरातील वॉर्डात, गावात, तालुक्यांतून नाही प्रतिसाद; आता जिल्ह्यात असणार एकच पतसंस्था

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गाव, तालुका अन् जिल्ह्यात पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, किचकट प्रक्रियेमुळे आता प्रत्येक जिल्ह्यात एकच पतसंस्था सुरू केली जाणार आहे. त्यासाठी १५०० प्राथमिक महिला सभासदांची अट असून १० लाख भागभांडवल आवश्यक आहे.
solapur sakal news
Mantralay maharashtrasakal media
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गाव, तालुका अन् जिल्ह्यात पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, किचकट प्रक्रियेमुळे आता प्रत्येक जिल्ह्यात एकच पतसंस्था सुरू केली जाणार आहे. त्यासाठी १५०० प्राथमिक महिला सभासदांची अट असून १० लाख भागभांडवल आवश्यक आहे. त्यामुळे कोणीच पुढे येत नसल्याने लाडक्या बहिणींच्या पतसंस्थेच्या निर्णयाला ब्रेक लागला आहे.

राज्य शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी वॉर्ड प्रभागासाठी (मुंबई, ठाणे, नवी मुंबई) प्राथमिक सभासद संख्या एक हजार, नोंदणीवेळी भाग भांडवल १५ लाख रुपये, उर्वरित महानगरपालिका क्षेत्रासाठी प्राथमिक सभासद संख्या ८००, नोंदणीवेळी भाग भांडवल दहा लाख रुपये, अशी अट आहे. संपूर्ण महानगरपालिका (मुंबई, ठाणे, नवी मुंबई) हद्दीसाठी प्राथमिक सभासद संख्या दोन हजार आणि नोंदणीवेळी भाग भांडवल ३० लाख रुपये तर उर्वरित महापालिका कार्यक्षेत्रांसाठी प्राथमिक सभासद संख्या १५०० आणि नोंदणीच्या वेळी भाग भांडवल २० लाख रुपये लागणार आहे. दुसरीकडे नगरपालिका क्षेत्रात सभासद संख्या ५०० आणि नोंदणीवेळी भाग भांडवल पाच लाख रुपये असणे आवश्यक असल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

तसेच गावातील पतसंस्थेसाठी प्राथमिक सभासद संख्या २५० आणि भाग भांडवल दीड लाख रुपये, तालुका कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या ५०० व भाग भांडवल पाच लाख रुपये तर जिल्हास्तरावरील पतसंस्थेसाठी प्राथमिक सभासद संख्या दीड हजार आणि भाग भांडवल १० लाख रुपये, याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व त्याखालील नियम, १९६१नुसार ही नोंदणी केली जाणार आहे. मात्र, एवढ्या महिला व भाग भांडवल जमा करणे शक्य नसल्याने आता शहरातील वॉर्ड, गाव, तालुक्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या पतसंस्था दिसणार नाहीत.

बचत गटातील महिलांची घेतली जाणार मदत

लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शहरातील वॉर्ड, गावागावात, तालुक्यात व जिल्ह्यात पतसंस्था सुरू करण्याचे नियोजित आहे. तसा शासन निर्णय पण निघाला, मात्र त्यासाठी अपेक्षेप्रमाणे महिला पुढे आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आता महिला आर्थिक विकास महामंडळाने (मआविम) त्यांच्याकडील नोंदणीकृत बचत गटांमधील महिलांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात एक पतसंस्था सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव सहकार खात्याला काही दिवसांत सादर होईल, असे ‘मआविम’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com