
कर्जाची परतफेड केली नाही म्हणून अवैध सावकरी करणाऱ्या सावकाराने कर्जदार महिलेची मुलगी विकायला भाग पाडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वैध सावकाराचा हैदोसाबाबत गंभीर आरोप केले आहेत. नी जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचा हैदोस वाढला आहे, असे आ. संजय गायकवाड यांनी परिषदेत सांगितले.