मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा मंत्र्यांवरच चालविण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मंत्रीपदाचे वाटप निश्‍चित झालेले असले, तरी खातेवाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधे उपमुख्यमंत्री पदासाठी नेत्याचे नाव अंतिम झालेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

दरम्यान, काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदे व मिळणारी खाती यावर सहमती मिळवली आहे. काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांची यादीदेखील तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांनाच आग्रह केला असून, त्यांचे मन वळविण्याची तयारी सुरू आहे. अजित पवार पक्षाच्या कामात सक्रिय झाले असले, तरी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत ते अद्याप तयार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षातील सर्व नेते व आमदार यांना अजित पवार मंत्रिमंडळात हवे असून, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून, सहा मंत्र्यांवरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत या सहा मंत्र्यांनाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यांवरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहांचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet expansion on after 21st December