मुहूर्त ठरला! शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी ?

नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी येत्या शुक्रवारीचा (ता. ५) मुहूर्त सापडल्याचे समजत असून, त्यामुळे राज्याला मंत्री मिळण्याची आशा आहे.
cabinet expansion oath ceremony of ministers in Shinde government on Friday mumbai
cabinet expansion oath ceremony of ministers in Shinde government on Friday mumbaisakal

मुंबई : नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी येत्या शुक्रवारीचा (ता. ५) मुहूर्त सापडल्याचे समजत असून, त्यामुळे राज्याला मंत्री मिळण्याची आशा आहे. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील १२ मंत्र्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोण शपथ घेणार, याची उत्सुकता सत्ताधारी पक्षांच्या आमदारांत आहेत. या मुहूर्तावर शपथविधी झाल्यास मंत्र्यांविना सरकारच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. या टप्प्यात भाजपचे सात आणि शिंदे गटाचे पाचजण शपथ घेऊ शकतात.

राज्यात भाजप आणि बंडखोर गटाचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला तरी मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिवसेना आणि बंडखोरांमधील वादासंदर्भात न्यायालयाच्या निकालामुळे मंत्रिमंडळ करण्यात अडचणी असल्याचे बोलले गेले.त्यापलीकडे जाऊन भाजपमधील कुरघोड्यांच्या राजकारणामुळेही विस्तार रखडल्याची चर्चा होती. लवकरच विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. तरीही, एवढ्या दिवसांत ते शक्य झाले नाही. त्यात आता पुन्हा पाच ऑगस्टचा मुहूर्त सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com