esakal | Exclusive : काँग्रेस-राष्ट्रवादीची यादी तयार; सोमवारपर्यंत खाते वाटप होणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-NCP-Maharashtra

शिवसेनेच्या खाते वाटपासंदर्भात सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याने शिवसेनेची यादी तयार झाल्यानंतर राज्यपालांच्या संमतीसाठी ती राजभवनकडे पाठविण्यात येईल.

Exclusive : काँग्रेस-राष्ट्रवादीची यादी तयार; सोमवारपर्यंत खाते वाटप होणार!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : बहुप्रतीक्षित खातेवाटप शनिवारी (ता.4) अंतिम झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्याकडील मंत्रिपदाच्या खाते वाटपाची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे. कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम घोषणेची आता प्रतीक्षा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी (ता.4) 'सह्याद्री' अतिथीगृहावर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची खातेवाटप संदर्भातील बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने त्यांच्याकडील खातेनिहाय मंत्री पदाची यादी मुख्यमंत्र्यांकडे सोपवली. काँग्रेसला तीन अधिक खाती वाढवून मिळाली असल्याने आज काँग्रेसने खाते वाटपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. 

- थोरातांनी उडवली भाजपची टर; म्हणाले 'भाजपची अवस्था...!'

अपेक्षेप्रमाणे गृहखाते अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आले असून जयंत पाटील यांना जलसंपदा खाते मिळाले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आली आहे. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूल मंत्रिपद, तर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम आणि नितीन राऊत यांचा ऊर्जा हे खाते देण्यात आले आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या खाते वाटपासंदर्भात सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याने शिवसेनेची यादी तयार झाल्यानंतर राज्यपालांच्या संमतीसाठी ती राजभवनकडे पाठविण्यात येईल, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादीची यादी तयार असली तरी अंतिम खाते वाटप सोमवारी (ता.6) जाहीर होईल, असा दावा करण्यात येत आहे. 

- Video : अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका : चंद्रकांत खैरे

संभाव्य खातेवाटप पुढीलप्रमाणे असेल :-  

राष्ट्रवादी काँग्रेस :

1) अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
2) जयंत पाटील - जलसंपदा
3) छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
4) अनिल देशमुख - गृह
5) दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
6) धनंजय मुंडे - सामाजिक न्याय 
7) हसन मुश्रीफ - ग्रामविकास
8) बाळासाहेब पाटील - सहकार व पणन
9) राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन 
10) राजेश टोपे - आरोग्य 
11) जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण 

- शेतकऱ्यांनो, आधार नोंदणी करुन घ्या कारण...

काँग्रेस :

1) बाळासाहेब थोरात - महसूल 
2) अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
3) नितीन राऊत - ऊर्जा 
4) विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
5) के. सी. पाडवी - आदिवासी विकास
6) यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण
7) अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक 
8) सुनील केदार - दुग्ध विकास व पशुसंवर्धन
9) वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
10) अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मस्तव्यवसाय, बंदरे 
11) सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर)
12) विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री
13) नवाब मलिक - कामगार