थोरातांनी उडवली भाजपची टर; म्हणाले 'भाजपची अवस्था...'!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

तीन पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहेत.

पुणे : राज्यातील सत्ता गेल्यामुळे भाजपाची अवस्था पाण्याबाहेरील तडफडणाऱ्या माशासारखी झाली असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी (ता.४) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.    

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप              

'दैनिक केसरी'च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी थोरात केसरीवाड्यात आले होते. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

- चंद्रकांत पाटील म्हणतात, 'एकत्र येऊन कशाला लढता?'

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी 'लग्नाची तयारी झाली आहे, नवरदेवही नटूनथटून बसलाय, पण लग्नाची वरात निघण्यापूर्वीच घोडा पळून गेल्याचे म्हटले होते.'' थोरात यांनी बापट यांच्या टिकेला उत्तर देताना हे मत व्यक्त केले आहे.

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

थोरात पुढे म्हणाले, राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळे काहीजण नाराज होणार हे समजून घेतले पाहिजे. तीन पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहेत.

- शेतकऱ्यांनो, आधार नोंदणी करुन घ्या कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Balasaheb Thorat criticized BJP Maharashtra