esakal | जो पालकमंत्री होईल, त्याला विश्वासात घेऊनच काम करू : अजित पवार 
sakal

बोलून बातमी शोधा

ajit.jpg

जो पालकमंत्री होईल, त्याला विश्वासात घेऊनच काम करू : अजित पवार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तारवाढ हा नागपूर अधिवेशन झाल्यानंतर होईल, तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करू. जो पालकमंत्री होईल, त्याला विश्वासात घेऊनच काम करू, असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी येथे पत्रकारांशी बोेलताना केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ''आपण पिंपरी शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत. तसेच शहरातील प्रश्न सोडवण्यात राजकारण आणले जाणार नाही. सर्वांना सोबत घोऊन काम करू. आत्ता जे खाते वाटप झाले आहे, ते काही काळा पुरते आहे. नागपूर येथील अधिवेशनात काही प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नांचे उत्तर कोणी द्यायचे, यासाठी सध्याचे खातेवाटप झाले आहे. 

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

सुदैवाने सध्या महाविकासआघाडीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात अनुभवी लोकं आहेत. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, मागच्या पाच वर्षांच्या सरकारच्या काळात सत्तेत होते. छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत व बाळासाहेब थोरात हे पूर्वी आघाडीच्या सरकारमध्ये होते. काही जणांनी दहा तर काहींनी पंधरा वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे अधिवेशनात कुठलीही अडचण येणार नाही."

ऑनलाईन व्यवहारात तरुणीला चार लाखांचा गंडा  

कामकाज सल्लागार समितीने सोमवार ते शनिवार कार्यक्रम दाखवलेला आहे. त्या काळात विधीमंडळाच्या माध्यमातून जनतेला महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे समजून जाईल, असेही अजित पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांबाबत बोलताना ते म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडी या महापालिकेत पूर्ण बहुमतात भाजप अशी स्थिती आहे. मी २० वर्षे शहराचे नेतृत्व केले आहे. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण न आणता काम करावे लागेल. काही अधिकारी राज्य शासन नेमते. आमचे अण्णा बनसोडे आहेत. शिवसेनेचे खासदार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन कामे करावी लागणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top