नगरपरिषदांच्या प्रचारासाठी उमेदवारांना ५ दिवसच! दुधनी, मंगळवेढा, अनगर येथून पाच जणांचे सहा अर्ज, ‘या’ आठ नगरपरिषदांमधून एकही अर्ज नाही

सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेतून एकमेव अर्ज आला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुधनी, मंगळवेढा व अनगर येथून पाच जणांनी सहा अर्ज भरले. अजूनही आठ नगरपरिषदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
प्रचार
प्रचारsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेतून एकमेव अर्ज आला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ११) दुधनी, मंगळवेढा व अनगर येथून पाच जणांनी सहा अर्ज भरले. अजूनही आठ नगरपरिषदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज भरण्यासाठी अजून पाच-सहा दिवस शिल्लक आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ व अकलूज नगरपरिषदांसह अनगर या एकमेव नगरपंचायतीसाठी आता मतदान होणार आहे. या निवडणुकीत चार लाख ४३ हजार ६०५ मतदार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण मतदारांमध्ये ११ हजार ५१४ दुबार-तिबार मतदार आहेत. त्यांच्या घरोघरी जाऊन ते कोठे मतदान करणार आहेत, यासंदर्भात लेखी घेतले जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची महायुती होणार की विरोधकांची आघाडी होणार? हे अजूनही निश्चित झालेले नाही. काही पक्षांकडून जरी नगरपरिषदांमध्ये आपल्याला बहुमत नाही मिळाले तरी नगराध्यक्ष आपलाच व्हायला हवा, अशी रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर तगडा व लोकप्रिय उमेदवारांची चाचपणी सर्वच पक्षांकडून सुरु आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम असा...

  • अर्ज भरण्याची मुदत : १७ नोव्हेंबरपर्यंत

  • अर्जांची छाननी : १८ नोव्हेंबर

  • अर्ज माघार : २१ नोव्हेंबर

  • हरकतीच्या ठिकाणी अर्ज माघार : २५ नोव्हेंबर

  • चिन्ह वाटप : २६ नोव्हेंबर

  • मतदान : २ डिसेंबर

  • मतमोजणी : ३ डिसेंबर

प्रचारासाठी अवघे पाच दिवसच

नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार असून तेव्हापासून ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचाराच्या तोफा थंडावतात. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारांना अवघ्या पाच दिवसांत प्रचार करावा लागणार आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अन्य मंत्र्यांच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये विशेषत: मोहोळ, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी या ठिकाणी सभा होऊ शकतात.

ठळक बाबी...

  • मंगळवेढ्यात एकाच पुरुष उमदेवाराने दोन अर्ज भरले

  • अनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकमेव महिला उमेदवाराचा अर्ज

  • अनगरमध्ये तिघांचे ऑनलाइन अर्ज भरले, त्यातील एकाने दिला नाही ऑफलाईन अर्ज

  • दुधनीत एक पुरुष व एका महिला उमेदवाराने भरला अर्ज, दोन्ही अर्ज नगराध्यक्षपदासाठी

  • बार्शी, कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मैंदर्गी, अकलूज येथून अद्याप एकही अर्ज नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com