esakal | सावधान! बिटकॉइनच्या नावावर होत आहे फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान... बिटकॉइनच्या नावावर होत आहे फसवणूक

सावधान! बिटकॉइनच्या नावावर होत आहे फसवणूक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : आभासी चलन म्हणजेच बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता बिटकॉईन फ्रॉडकडे मोर्चा वळविला आहे. सोशल मीडियावरून लिंक पाठवून गुंतवणुकदारांना जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांचे ॲप डाऊनलोड करायला सांगून लाखोंनी फसवणूक करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आता या गुन्ह्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या एका बिटकॉईनची किंमत जवळपास ३४ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. सध्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये आभासी चलन क्रीप्टोकरंसीमध्ये गुंतवणुकीवर भर दिल्या जात आहे. एका कॉईनची किंमत दिवसेंदिवस हजारोंमध्ये वाढत असल्यामुळे बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होत आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील बिटकॉईन उलाढालीची इत्थंभूत माहिती या टोळीच्या सदस्यांना असते. विशेष म्हणजे सुंदर तरुणी सायबर गुन्हेगारांच्या टोळीच्या प्रमुख अस्त्र आहेत. इंस्टाग्राम, फेसबुकसह अन्य सोशल मीडियावरून लिंक पाठविल्या जातात.

हेही वाचा: मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

इंस्टाग्रामवरील अनेकांना बिटकॉईन आणि प्रोट्रेड ॲपबद्दल माहिती असलेल्या लिंक पाठवितात. सुंदर तरूणीचा फोटो प्रोफाईलला असतो तर फोटोंमध्ये त्या तरूणीचे ‘हॉट’ फोटो असतात. लगेच बोलायला सुरवात करतात. स्वतःची माहिती ‘बिजनेस इन्व्हेस्टर सांगून चॅटिंग करतात. काहीच दिवसांत बिटकॉईनमध्ये कसे लाखो रुपये कमविल्या जातात, याचे फंडे सांगतात. चॅटिंग करणारा व्यक्ती जर स्वतः बिटकॉईन विकत घेत नसेल तरी त्याला त्याच्या श्रीमंत मित्रांना गुंतवणुकीचा फंडा देण्यास सांगतात.

ॲपची लिंक

तरूणी व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करताना बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लिंक पाठवते. त्या लिंकमधून प्रोट्रेड ॲप किंवा अन्य कोणत्याही नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगते. हे ॲप सहसा प्ले स्टोअर्स किंवा अन्य मान्यता प्राप्त ठिकाणी नसतात. ते डाऊनलोड झाल्यानंतर त्यात डॉलर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगते. त्यासाठी भारतीय चलनाचे डॉलर्समध्ये करंसी करण्या करिता ‘बायनान्स’ सारखे ॲप डाऊनलोड करायला सांगून त्यातून बीट क्वाईन ‘वॉलेट’ तयार केले जाते.

हेही वाचा: दहशतवादी जान महंमदला दिलं तिकीट, मुंबईतून तरुणाला अटक

अशी करतात फसवणूक

पहिली रक्कम गुंतवणूक केल्यानंतर तीन दिवसांतच तिप्पट रक्कम लाभ झाल्याचे सांगून वॉलेटमध्ये ती त्यांच्या ॲप मध्ये जमा झाल्याचे दाखवितात. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्याला विश्‍वास बसतो. दुसऱ्यांदा मोठी रक्कम गुंतवतो. त्यावरही दुप्पट रक्कम परत केल्या जाते. कमी दिवसांत हजारोंचा फायदा लक्षात घेता तिसऱ्यांदा लाखोंमध्ये गुंतविण्यास भाग पाडतात. त्या रकमेवर २० पट लाभ दाखवून आभासी पद्धतीने वॉलेटमध्ये जमा करतात. परंतु ती रक्कम केव्हाच विड्राल करताना होत नाही. अशा वेळी रक्कम काढण्या करिता विविध कारणे देवून यामध्ये आणखी रक्कम भरण्यास भाग पाडल्या जाते. शेवटी त्या ॲपचा आय डी पासवर्ड चालत नाही. अशा प्रकारे गुंतवणूकदाराचे दिवाळे काढून फसवणूक केल्या जाते.

काय आहे बिटकॉईन?

बिटकॉईन हे आभासी चलन (क्रिप्टोकरंसी) असून ऑनलाइन माध्यमातून ई-वॉलेट किंवा ई-बॅलन्स स्वरूपात दिसते. यावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे बिटकॉईन थेट आंतरराष्‍ट्रीय मार्केटशी जुळलेले असून चलन स्वरूपात स्वीकारल्या जात आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन आहे. एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड असून बँकांमधून नोटा मिळतात तसेच ऑनलाइन साईट्सवर हे चलन खरेदी करता येते.

"सोशल मीडियावरील मुलीच्या नावाने व्हॉट्सॲपद्वारे बोलणाऱ्या या व्यक्तीबाबत सत्यता पटत नाही. विदेशी नंबर पासून सावध रहा. मॅसेज,व्हॉट्स ॲपद्वारे येणारे ॲपवर कोणीही विश्‍वास ठेवू नये. अशा ॲपमध्ये केलेली गुंतवणूक धोकादायक आहे. सरकार मान्य चलना व्यतिरिक्त विदेशी आभासी चलनातील गुंतवणूक आणि त्यावर झालेली फसवणूक याचा माग काढणे आणि ती रक्कम परत मिळविणे अतिशय कठीण असते याचा विचार करा. अशा सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकू नका."

- केशव वाघ, (ठाणे प्रभारी अधिकारी, सायबर पोलिस स्टेशन)

loading image
go to top