समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? बार परवान्याप्रकरणी Excise ची नोटीस

Excise Notice to Sameer Wankhede
Excise Notice to Sameer Wankhedee sakal

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede)यांना अपात्र असूनही बारचा परवाना देण्यात आला होता, असा दावा मंत्री नवाब मलिक (Maharashtra Minister Nawab Malik) यांनी केला होता. त्यानंतर आता केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने वानखेडे यांना 1997 मध्ये जारी केलेल्या बार परवान्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Excise Notice to Sameer Wankhede
समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा! मलिकांचा बॉम्ब

नवी मुंबईतील हॉटेल सदगुरुमधील बारचा परवाना घेतला तेव्हा वानखेडे हे १७ वर्षांचे होते, असा दावा मलिकांनी केला होता. याच आरोपांची चौकशी करण्यासाठी १० डिसेंबर रोजी वानखेडेंना नोटीस बजावण्यात आली. परवान्यासाठी अर्ज करताना वानखेडे यांनी वयाचा कोणताही पुरावा दिला नसल्याचे समोर आले आहे, असे ठाणे उत्पादन शुल्क युनिटचे अधीक्षक नीलेश सांगडे यांनी सांगितले.

समीर वानखेडेंना येत्या १७ डिसेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी त्यापूर्वी नोटीसला लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावणी घेणार असून सुनावणीच्या निकालावर पुढील कार्यवाही अवलंबून असेल, असेही सांगडे यांनी सांगितले. वानखेडे यांनी वयाचा कोणताही पुरावा सादर केलेला नसताना परवाना कसा दिला गेला, याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Excise Notice to Sameer Wankhede
अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळलं पाहिजे ; नवाब मलिक

आमची काय चूक? - ज्ञानदेव वानखेडे

वयाची पात्रता १८ वर्षे असल्याचे गृहीत धरून परवान्यासाठी अर्ज सादर केला होता. समीर त्यावेळी 17 वर्षे आणि 10 महिन्यांचा होता आणि विचारविनिमय केल्यानंतर समितीने परवाना मंजूर केला आहे. आम्ही असे गृहीत धरले होते की या प्रक्रियेला दोन महिने लागतील ज्या दरम्यान समीर १८ वर्षांचा होईल. समितीने लगेच परवाना जारी केला तर आमची चूक कशी? असा सवाल समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी केला आहे. पण, बारच्या परवान्यासाठी पात्र वय २१ वर्ष असल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यायालयात जाण्यास तयार -

जर उत्पादन शुल्क विभागाला माझा परवाना रद्द करायचा असेल तर त्यांनी परवाना शुल्क म्हणून भरलेले लाखो रुपये परत करावेत. यासाठी मी न्यायालयात जाण्यास तयार आहे, असेही वानखेडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com