
'सरकारने त्यांच्या पक्षातील नेत्यांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न'
केंद्र सरकारच्या कामगिरीवर जनता खुश - पंकजा मुंडे
केंद्र सरकारच्या (Central Govt) कामगिरीवर देशातील जनता खुश आहे. सरकारकडे मागण्या मागण्याचा संघटनांचा हक्क असून त्यांनी तो हक्का बजावावा. सरकार या मागण्या नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या लोकांची मी प्रतिनिधी असून सरकारने त्यांच्या पक्षातील नेत्यांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा: महाआघाडी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार; MLA ठाकूरांना मोठा धक्का
यावेळी मुंडे यांना एसटी (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, एसटीबाबत व्यवस्थित चर्चा झाली नाही. एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले आहे. त्यामुळे संपाचा वाद चिघळला आहे. त्यामुळे सरकारने यावर योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
औरंगाबाद येथील घटनेसंदर्भात त्या म्हणाल्या, औरंगाबाद (Aurangabad) येथील मेडिकलमध्ये ज्या नशेच्या गोळ्या मिळतात त्याबाबत तेथील संबंधित पालकमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadahv) यांच्यावरील ईडी कारावाईबाबत त्या म्हणाल्या, तपास यंत्रणा त्यांचा तपास करतील, यावर मी फार काही बोलणार नाही. मुख्यमंत्री सभागृहात काय बोलले हे मी ऐकललं नाही. मी काश्मीर फाईल्स सिनेमाही पाहिलेला नाही. मात्र ओबीसी आरक्षनाशिवाय (OBC Reservation) निवडणुका होऊ नयेत असेही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: महाराष्ट्रासह 9 राज्यांत CBI ला 'नो एंट्री'
Web Title: Central Govt Working Happy Pubic In Maharashtra Says Pankaja Munde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..