esakal | दिव्यात काँक्रीटीकरण रस्त्यावर बेकायदा पार्किंग; वाहनचालकांना नाहक त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

Diva road

दिव्यात काँक्रीटीकरण रस्त्यावर बेकायदा पार्किंग; वाहनचालकांना नाहक त्रास

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : दिवा शहरातील (Diva) रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणची (concrete road) कामे सुरू आहेत. काही भागात रस्त्याच्या एका बाजूने सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. मात्र तो भाग वाहन पार्किंग (vehicle parking), गॅरेज चालकांनी व्यापलेला आहे. यामुळे वाहन चालकांना खराब काम सुरू असलेल्या रस्त्यावरून वाहन चालवावी लागत असल्याने चालकांमध्ये नाराजीचे(Vehicle driving issue) वातावरण आहे. सिमेंट काँक्रीटीकरण झालेली रस्त्याची बाजू वाहन चालकांना खुली करावी अशी मागणी दिवेकर (divekar demands) करीत आहेत.

हेही वाचा: गौतम नवलखा यांच्या याचिकेवर एनआयए आणि राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट

दिवा शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे रस्ते फेरीवालामुक्त करा अशी मागणी होत असतानाच केवळ फेरीवाले नाही तर शहरातील गॅरेज चालकही रस्ते अडवून ठेवत असल्याचे दिसून येते. रस्ते वापरात नसल्याने काही नागरिक या रस्त्यावर बिनधास्त वाहन पार्क करून जात आहेत. आधीच खराब रस्त्यांमुळे मेटाकुटीला आलेल्या दिवेकरांना अद्यापही चांगले रस्ते मिळू शकलेले नाही. शहरातील रस्ते अरुंद आहेत, त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करून दिवेकरांना चांगल्या रस्त्यांची सुविधा देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. मात्र गेले काही वर्षे या रस्त्यांची कामे सुरू असून ती अद्याप पूर्णत्वास आलेली नाहीत.

रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडीत सकाळ संध्याकाळ भर पडत आहे. सिमेंट काँक्रीटीकरण झालेले रस्ते हे वाहतुकीसाठी खुले झालेले नसल्याने त्यांचा कब्जा फेरीवाला, गॅरेज चालकांनी घेतला आहे. दातीवली, आगासन रस्त्यावर हे चित्र दिसते. गॅरेजचालक दुरुस्ती साठी आलेली वाहने या रस्त्यांवर उभी करत असून प्रवास करणाऱ्या वाहनांना त्याचा वापर करता येत नाही. परिणामी खराब, काम सुरू असलेल्या ओबडधोबड रस्त्यावरूनच वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे.

हेही वाचा: राममंदिर बांधकामात आमदार गोरे यांनी कारसेवेने प्रायश्चित्त घ्यावे- मनीषा कायंदे

"ठाण्यात सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्यानंतर फेरीवाल्यांना ठाणे स्टेशन परिसरातून हलविण्यात आले. दिव्यातील रस्तेही फेरीवाला मुक्त करावे अशी मागणी होत आहे, त्यासोबतच रस्ते गॅरेज मुक्तही करावे. वाहनचालक सध्या कोणत्या त्रासाचा सामना दररोज करतात हे त्यांनाच माहीत आहे."

-राजेश उतेकर, दिवा प्रवासी

"दिव्यातील रस्त्यांची कामे गेले काही वर्षे सुरू आहेत. मात्र ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. ज्या भागाचे काम झाले ते रस्त्यांवर वाहने उभी केली जातात, दुकानदार - फेरीवाले त्याचा वापर करीत आहेत. लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करावी एवढेच म्हणणे आहे."

-पायल यादव, रहिवासी

"रस्ता अडविणारे फेरीवाले, गॅरेज चालक यांच्यावर वारंवार कारवाई केली जाते. नागरिकांनी आपल्या तक्रारी महापालिका प्रशासनाला कळवाव्यात, त्यानुसार कारवाई होत जाईल. नागरिकांच्या तक्रारी आल्यास फेरीवाले, गॅरेजचालकांचेही धाडस होणार नाही पालिकेचे रस्ते अडविण्याचे."

- अलका खैरे, सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती

loading image
go to top