‘सीईटी’ परीक्षा यंदा दोन गटांत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निर्णय 
एमएचटी- सीईटी परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या कालावधीत घेण्यात येईल. परंतु, या तारखांना कोणती परीक्षा घेण्यात येईल, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पीसीबी आणि पीसीएम यापैकी कोणत्या गटाची परीक्षा अगोदर घ्यायची, याचा निर्णय घेण्यात येईल, असे सीईटी कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीईटी कक्षाचा निर्णय

  • एप्रिलमध्ये ‘पीसीएमबी’ गटाची परीक्षा होणार नाही
  • एकत्रित गटाचा पर्याय बंद केल्याने दोन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार
  • दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही
  • दोन्ही परीक्षांसाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार

मुंबई - अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) आणि अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशा दोन परीक्षा २०२० मध्ये घेण्यावर प्रवेश नियामक प्राधिकरणाने (एआरए) शिक्कामोर्तब केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

‘सीईटी’साठी पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच सीईटी परीक्षा घेण्यात येत असे; पंरतु एप्रिलमध्ये होणाऱ्या ‘सीईटी’त हा गट रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

आणखी वाचा - शिवसेना म्हणते, अजित पवारांचा पापडही भाजपला भाजता आला नाही 

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा घेण्यात येतात. राज्यातील काही वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या गटातून आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या गटातून परीक्षा घेण्यात येतात. त्याचबरोबर गेल्या वर्षीपर्यंत दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्यांची पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच परीक्षा घेतली जात होती.

मराठा आरक्षण आंदोलनप्रकरणी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीबी’ आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीएम’ अशा वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील. दोन्ही अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही गटांच्या परीक्षा द्याव्या लागतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्षेत्र सुरुवातीलाच निश्‍चीत करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET exam in two group