ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

student
ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता

ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता

सोलापूर : कोरोना काळात बारावीची परीक्षा झाली आणि लिखाणाचा सराव मोडल्याने अनेक मुलांना विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल प्रवेशाच्या पात्रतेसाठी लागणारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांत कमी गुण मिळाले. त्यांच्यासाठी आता बोर्डाने तुरळक विषय घेऊन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून त्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

अभियांत्रिकी किंवा फार्मसी प्रवेशाच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणारा, पण ज्याची परीक्षा संबंधित विद्यार्थ्याने यापूर्वी दिलेली नाही, असा एक किंवा जास्तीत जास्त चार विषय घेऊन ही परीक्षा देता येते. बोर्डाची मुख्य परीक्षा झाल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जेव्हा परीक्षा होते, त्याचवेळी तुरळक विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा असते. या परीक्षेसाठी १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मुदत आहे. त्यात आणखी आठ दिवसांची वाढ अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा होणार असून त्याचे नियोजन सुरु आहे. तत्पूर्वी, बोर्डाची फेरपरीक्षा होऊन निकाल जाहीर होईल. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी ही तुरळक विषय घेऊन पात्रता पूर्ण करण्याची संधी गमावू नये, असे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयांनी केले आहे. जेणेकरून अभियांत्रिकी प्रवेशाला कोणताही अडथळा येणार नाही.

हेही वाचा: विवाहानंतर पतीने दिली साथ अन्‌ विश्वास! पत्नी दुसऱ्याच प्रयत्नात झाली फौजदार

एक ते चार विषय घेऊन परीक्षा देता येईल

अभियांत्रिकी किंवा अन्य कोणत्याही विद्याशाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने प्रवेश मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी तुरळक विषय घेऊन (ज्या विषयांची परीक्षा दिली नाही, असे विषय) पुन्हा परीक्षा देण्याची संधी बोर्डाकडून दिली जाते. ते विद्यार्थी एक किंवा अधिकाधिक चार विषय घेऊ शकतात.

- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

हेही वाचा: राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

तुरळक विषय घेऊन द्यावी परीक्षा

बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना फिजिक्स, मॅथ्‌स व केमिस्ट्री या विषयांत प्रवेशासाठी लागणारे आवश्यक गुण नाहीत. त्या विद्यार्थ्यांनी व्होकेशनल किंवा प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणरे तुरळक विषय घेऊन पुन्हा बोर्डाची तेवढ्याच विषयाची परीक्षा द्यावी. जेणेकरून अभियांत्रिकी प्रवेशाची पात्रता पूर्ण होईल.

- डॉ. जे. बी. दफेदार, प्राचार्य, ऑर्किड कॉलेज, सोलापूर

हेही वाचा: 'जुन्या पेन्शन'चा मार्ग खडतर! राज्याचे उत्पन्न अन्‌ वेतन,‌ पेन्शनवरील खर्चाचा बसेना ताळमेळ

...अन्यथा घ्यावा लागेल डिप्लोमाला प्रवेश

बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील मुलांना गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत १३५ तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२० गुण असावेच लागतात. एखाद्या विद्यार्थ्याचा त्या विषयांसोबतच व्होकेशनल विषय असेल (कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिक, आयटी) तर कमी गुण पडलेला विषय वगळून त्या व्होकेशनल विषयाचेही गुण ग्राह्य धरले जातात. पण, व्होकेशनल विषय नसलेल्यांची मोठी पंचाईत होते आणि त्यांना अभियांत्रिकीला नव्हे तर डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे अशा मुलांनी बोर्डाच्या माध्यमातून तुरळक विषय निवडून परीक्षा द्यावी, असे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयांनी केले आहे.

Web Title: Cet In August Eligibility For Engineering Can Be Completed By Passing An Examination In Rare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top