अकरावी प्रवेशासाठी CET नेमकी कशी होणार? शिक्षण विभागाची घोषणा

admission
admissione sakal

नागपूर : राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द (10th class exam) करण्यात आल्यात. त्यामुळे अकरावीचे प्रवेश कसे मिळणार याबाबत पालकांमध्ये चिंता होती. मात्र, बोर्डाने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षेचा (cet for 11th admission) पर्याय दिला होता. ही परीक्षा नेमकी कशी होईल याबाबत शालेय शिक्षण विभागाने (maharashtra state education depatment) अधिसूचना काढून घोषणा केली. त्यानुसार वैकल्पिक सीईटी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठी ‘ओएमआर शीट'चा वापर करण्यात येणार आहे. (cet to be offline mode for 11th class admission in maharashtra)

admission
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सज्जतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सीईटी परीक्षा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्यात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, एसईआरसीटीईचे संचालक, बालभारतीचे संचालक, परीक्षा परिषदेचे आयुक्त, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक सदस्य सचिव आहेत. सीईटी परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असल्याचे जाहीर केले आहे. तरी विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल. प्रवेश फेरीच्या पहिल्या टप्प्यात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. यानंतरच रिक्त राहणाऱ्या उर्वरित जागांवर सीईटी न देणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. अशा विद्यार्थ्यांना दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल. याशिवाय सीबीएसई, आयसीएसईसह आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना देता येणार

परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहूपर्यायी -

सामाईक प्रवेश परीक्षेचे स्वरूप कसे असेल याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. यानुसार सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयावर प्रत्येकी २५ गुण असतील. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहूपर्यायी स्वरूपाचे राहणार आहे. ही परीक्षा ‘ओएमआर' वर आधारित असेल. १०० गुणांच्या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ऑनलाइन भरावे लागेल अर्ज -

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावी सीईटीसाठी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय मंडळाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क द्यावे लागेल. परीक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदे मार्फत घोषित करण्यात येणार आहे. ही परीक्षा दहावीचा निकाल लागल्यावर जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com