जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणारच - पाटील

जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणारच - पाटील

राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार गोंधळलेले असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची वाट लागली, असा आरोप भजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन आणि एमपीएससी परिक्षासंदर्भात आपलं मत व्यक्त करताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच राज्यात जिथे जिथे आंदोलन होणार, तिथे तिथे भाजप जाणारच, अशी ठाम भूमिकाही पाटील यांनी व्यक्त केली.

एमपीएससी परिक्षासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे  सरकारमध्ये बेबंदशाही आहे. आपापसांत कोणताच ताळमेळ नाही. सरकारमधील प्रत्येक नेता वेगवेगळी भूमिका मांडतोय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार एक नंबर लबाड सरकार आहे. तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात? पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा. जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणारच, असेही ते म्हणालेत. 

व्यापार बंद करा, कंपन्या बंद करा, हे काही परवडणारे नाही..त्यामुळे लॉकडाऊन करू नये..जगात अनेक आजार आले, आताही आहेत.. योग्य ती काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरू राहील पाहिजे..कर्नाटक सरकारने योग्य ती खबरदारी घेत परीक्षा घेतल्या..लॉकडाऊन होणार नाही असे धोरण ठरवावे लागेल, असे यावेळी ते म्हणाले. राज्यातील लॉकडाउनसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, त्या त्या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनचा निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारनं लॉकडाउन न करता निर्बंध घालायला हवेत. तसेच मॉल, हॉटेलमध्ये काही निर्बंध हवे आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com