
निवडणुका, राजकीय ओबीसी आरक्षणावर चंद्रकांत पाटलांचे विधान, म्हणाले...
मुंबई : पावसामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास राजकीय ओबीसी आरक्षणासाठी ते फायदेशीर ठरेल, असा आमचा विश्वास आहे. कारण, राजकीय ओबीसी आरक्षणासाठी आणखी वेळ मिळेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत व्यक्त केले. (Chandrakant Patil marathi News)
सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची (Election Commission) शिष्टमंडळ भेट घेईल. सर्व ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीचे सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित राहणार, असे दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. यानुसार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचा: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, पूरस्थितीच्या पाहणीसाठी तातडीचा विदर्भ दौरा
राज्य सरकारसोबत (State Government) चर्चा न करता ऐन पावसाळ्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक (Election Commission) आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबरनंतर घ्याव्या, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. ‘निवडणूक आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेतल्या तर केवळ २० टक्के नागरिकांनाच मतदान करता येईल’, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले होते.
निर्णय लोकप्रतिनिधी व जनतेला मान्य नाही
राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय राज्यातील एकाही पक्ष, लोकप्रतिनिधी व जनतेला मान्य नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेते निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलाव्या, अशा मताचे आहेत.
Web Title: Chandrakant Patil Postponing Election Beneficial Political Obc Reservation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..