Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील म्हणतात, 'मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय करून निवडणूक लढवतोय'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

- पक्षाने कोथरूडमधून निवडणूक लढवायला सांगितले

- विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी व येथील मतदारांवर अन्याय करून कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवतोय.

औंध/पुणे : पक्षाने कोथरूडमधून निवडणूक लढवायला सांगितल्याने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी व येथील मतदारांवर अन्याय करून कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडमधील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) केले.

बाणेर बालेवाडी येथील नागरिकांशी कंफर्ट झोन सोसायटीत प्रचारार्थ संवाद साधताना ते बोलत होते. मेधा कुलकर्णी यांच्यासह येथील सर्व लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले. परंतु पक्षनेतृत्वाच्या इच्छेखातर इथून मी निवडणूक लढवत असून, सर्वांनी सहकार्य करावे असे भावनिक आवाहनही केले. भाजपच्या सत्ता काळात हिंसाचाराची एकही घटना घडली नसून सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम भाजपने केल्याचेही पाटील म्हणाले. तर मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातून लाखोंचे मोर्चे निघूनही समन्वयाने सर्व शांततेत हाताळले गेले. 34000 कोटींची कर्जमुक्तीसह जनसामान्यांचे प्रश्न भाजप सरकारने प्राधान्याने सोडवल्याचेही ते म्हणाले.

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर; कोण कोण करणार प्रचार?

दरम्यान, बाणेर येथील बंटरा भवन येथे बंट समाज बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. तसेच स्थानिक नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे समस्या संदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी बाणेर बालेवाडी व्यापारी संघटनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करुन पाठिंबा दर्शवला.

Vidhan Sabha 2019 : विखे-पाटलांचा अर्ज धोक्यात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil says about Kothrud Candidacy Maharashtra Vidhan Sabha 2019