Vidhan Sabha 2019 : 'चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री व्हावेत'

Vidhan Sabha 2019 : 'चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री व्हावेत'

कोल्हापूर : गावातील व्यक्ती राजकारणात मोठी झाली की त्याला गावाचा कसा अभिमान असतो हे आज राधानगरी तालुक्यातील एका दुर्गम भागात पाहावयास मिळाले. तालुक्यातील खानापूर या गावातील राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल या गावाला प्रचंड आदर तर आहेच परंतु दादा राज्यात एक नंबरचे नेते व्हावेत, अशी इच्छा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली.

खानापूर या दुर्गम भागातील गावांमध्ये अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले चंद्रकांतदादा पाटील आज राज्याचे महसूलमंत्रिपदावर पोहोचले आहेत. राजकीय क्षेत्रात उच्च पदावर गेल्यावर त्यांनी या भागात अनेक विकासकामे केली त्यांच्यामुळे या भागाचा कायापालट झाला वेगवेगळ्या योजनेतून त्यांनी या भागासाठी भरीव निधी दिला आणि त्यातून अनेक मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या रस्ते असो वा पाण्याचा प्रश्न यासाठी त्यांनी आपली ताकद पणाला लावून या भागाचा विकास करण्यासाठी झटले.

गावाबद्दल त्यांनाही असलेली आपुलकी या भागातील नागरिकांना आदर्श ठरली. त्यामुळेच या भागातील नागरिक चंद्रकांत दादा पाटील यांचा मोठा आदर करतात आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांशी संवाद साधला असता चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल त्यांच्या जन्मगावी व परिसरात कशा पद्धतीने सहानुभूती आहे. हे पाहावयास मिळाले. दादा राजकारणात आता मोठे नेते व्हावेत अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना एक नंबरचे पद मिळावे यासाठी गावकरी आता प्रार्थना करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com