भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट | Chandrashekhar Bawankule Big Statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule Big Statement

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Chandrashekhar Bawankule Big Statement: भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत आहे. अशातच त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटकडून पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपुर्वी बीडच्या पाटोदा तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू होता. या सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडावर गेले होते.

हेही वाचा: Sharad Pawar: ज्यांच्या तोंडी नेहमी साखर..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

मात्र या सभेला पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांची नाराजी कायम आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सगळं अलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले "पंकजा मुंडे यांची बदनामी करणारे आणि भाजपची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत. पक्षाला बदनाम करणारं एक युनिट पक्षातच आहे. बदनामी करण्याचे कामा कोणीतरी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: Eknath Shinde : "मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो"

तसेच पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि . तेच हे काम करत आहे., अशी कबुलीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पंकजा या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत त्यामुळे बोलताना त्यांच्या सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे आता भाजप मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

टॅग्स :Pankaja MundeBjp