'शाहरुख भाजपात गेल्यास आर्यनकडे सापडलेले अंमली पदार्थही साखर होईल'

भाजपविरोधात बोलल्यानंतर केंद्र सरकार आयकर, ईडी आणि सीबीआय संस्था मागे लावून देते.
chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

बीड : भाजपविरोधात बोलल्यानंतर केंद्र सरकार आयकर, ईडी आणि सीबीआय संस्था मागे लावून देते. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अंमलीपदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शाहरुपने भाजपात प्रवेश केला तर त्याच्या मुलाजवळ (Aryan Khan Drug Case) सापडलेले अंमलीपदार्थ साखर होतील, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. बीड येथे शनिवारी (ता.२३) ओबीसी कृतज्ञता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, की इंधन, गॅसच्या दरवाढीमुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'ना पकाने दूंगा, ना खाने दूंगा' असे म्हणावे.

chhagan bhujbal
औरंगाबादच्या नामांतरावर जलील म्हणाले, हिंमत असेल तर नाव बदला

फडणवीसांना आरक्षण संपवायचे आहे का?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका करणारा राहुल वाघ हा धुळे जिल्हा भाजपचा सरचिटणीस आहे. आम्ही अध्यादेश काढायचा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात जाऊन रोखायचा. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींचे आरक्षणच संपावयचे आहे, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devoleena Bhattacharjee Praises Tukaram Mundhe
Maharashtra Latest Marathi News Live Update
Maharashtra Organ Donation Story Brain Dead Deepak Mulekar Gives Four Patients A New Chance At Life Through Donation
Manoj Jarange Bawankule Row Escalates As Revenue Minister Denies Caste Certificate Cancellation Allegations
Marathi News Esakal
www.esakal.com