
Bhujbal Sets Example by Donating His Monthly Salary to Aid Flood Victims
Esakal
राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. जे जिल्हे दुष्काळी म्हणून ओळखले जात होते आज त्याच जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलंय. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचा चिखल झालाय, घरांमध्ये पाणी शिरलंय तर जनावरं वाहून गेल्यानं बळीराजावर मोठं संकट ओढावलंय. मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासूनच मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात पाहणीसाठी जात आहेत. मंत्री छगन भुजबळ हेसुद्धा येवल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते येवल्यातील अतिवृष्टीच्या भागाची पाहणी करणार आहेत. दरम्यान, भुजबळ यांनी शेतकऱ्यांसाठी एक पाऊल उचलत महिन्याभराचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याची घोषणा केलीय.